'हे' आहेत 'वैभवशाली अहमदनगर छायाचित्र स्पर्धे'चे विजेते.. इतिहासाचे अभ्यासक गिरमकर यांच्या हस्ते गौरव

अहमदनगरसध्याचा राजकिय काळ ज्ञानी लोकांऐवजी गुणी लोकांवर भरोसा ठेवण्याचा आहे. गुणी लोक सर्वसामान्यांसाठी मोकळ्या मनाने काम करतात. पण ज्ञानी लोक हातचे राखुन रहातात, असा माझा अनुभव आहे. आजच्या राजकिय, सांस्कृतिक गोंधळाच्या काळात कवी, लेखक, चित्रकार, छायाचित्रकार यांनी स्पष्ट भुमिका घेतली पाहिजे.

त्यांनी बोटचेपे धोरण सोडून दिले पहिजे. असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष तथा इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. के. एल. गिरमकर यांनी केले. अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त राजर्षी शाहू स्मृतिशताब्दी समितीच्या वतीने 'वैभवशाली अहमदनगर' मोबाईल छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले होते.

त्यांनी दोनच दिवसांत ६३ स्पर्धक सहभागी झाले याचे कौतुक केले. छायाचित्रकार मनस्वी कलावंत असतो. त्याला चांगल्या वाईटाची जाण आणि तशी दृष्टी असते. त्याने सजग राहिले पाहिजे असेही ते पुढे म्हणाले. पाहुण्यांचे स्वागत युनूसभाई तांबटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रसिध्द छायाचित्रकार संजय वाघ आणि न्यु आर्टस् कॉलेजच्या कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांनी अगदी कमी वेळेत छायाचित्रांचे परिक्षण केले.

स्पर्धेचा निकाल - अहमदनगर शहरातील जुन्या वास्तुवरील शिल्प, चित्र अथवा डिझाईन, विजेता - महेश कांबळे, प्रोत्साहनपर - ओंकार साबळे. जुने घर किंवा जुन्या वाड्याचा दरवाजा, विजेता - गणेश शिंदे, प्रोत्साहनपर - नितीन गवळी.

अहमदनगर शहरातील 'वारसा वृक्ष' (जुने जिवंत झाड), विजेत्या - क्षितीजाराणी शिवकन्या पहिलवान, प्रोत्साहनपर - दत्तात्रय भारत थिटे. अहमदनगर शहरातील शिलालेख, विजेता - अंबादास गाजुल, प्रोत्साहनपर - नितीन गवळी.

प्रथम विजेत्या स्पर्धकास १ हजार रुपये रोख आणि प्रशस्तिपत्र तसेच फोटोप्रिंट असे बक्षीस देण्यात आले. प्रोत्साहनपर विजेत्यांस प्रशस्तिपत्र आणि गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता' ही ग्रंथप्रत तसेच फोटोप्रिंट देण्यात आली. यातील सर्व सहभागींना सहभागाबद्दल प्रशस्तिपत्र देण्यात आले.

प्रास्तविक भैरवनाथ वाकळे यांनी केले. राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी समितीची भुमिका कॉ. प्रा. डॉ. महेबुब सय्यद यांनी मांडली. सुत्रसंचालन किरण डहाळे यांनी केले. त्यास उध्दव काळापहाड यांची साथसंगत लाभली तर आभार प्रदर्शन संध्या मेढे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अरविंद मुनगेल, तारीक शेख, दिपक शिरसाठ, अरुण थिटे, रामदास वागस्कर, फिरोज शेख, गौतम कुलकर्णी, ऋषीकेश वाघ आदींनी परिश्रम घेतले.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !