अबब ! विदेशी मद्याने भरलेला कंटनेरच केला जप्त

अहमदनगर -  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे व अहमदनगरच्या भरारी पथकांनी संयुक्त मोहिम राबवत गोवा राज्यात विक्रीसाठी पाठवला जाणारा विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे. पारनेर तालुक्यातील अहमदनगर-पुणे रस्त्यावरील पळवे शिवारात ही कारवाई करण्यात आली.


या मद्यसाठ्याची बाजारभावाप्रमाणे १ कोटी २१ लाख ५० हजार रूपये एवढी किंमत आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनांसह ३ जणांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक- नारायणगांव व तळेगांव दाभाडे, निरीक्षक, यांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई झाली.

दि. १६ जून रोजी पारनेर तालुक्यातील अहमदनगर- पुणे रस्त्यावरील हॉटेल गारवासमोर पळवे शिवारात गोवा राज्यात विक्रीसाठी पाठवला जात असलेला विदेशी मद्यासह भरलेला कंटेनर उभा आहे. तेव्हा त्याठिकाणी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने चालक प्रदिप परमेश्वर पवार (ता. तांबोळी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यास कंटेनरसह ताब्यात घेतले.

या कंटेनरमध्ये विदेशी मद्याचे १५५० बॉक्सेस आढळून आले. या गुन्ह्यात प्रथमदर्शनी बापू भोसले (खवनी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) व निखिल कोकाटे (रा. तांबोळी, ता. मोहोळ, जि. सोलापूर)  यांचा सहभाग दिसला. म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, अंमलबजावणी व दक्षता विभागाचे संचालक सुनिल चव्हाण, पुणे विभागीय उपायुक्त अनिल चासकर, अहमदनगरचे अधीक्षक गणेश पाटील, उपअधीक्षक बी. टी. घोरतळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

पुण्याचे अधीक्षक सी. बी. राजपूत, नारायणगावचे दुय्यम निरीक्षक महिपाल धोका, तळेगाव दाभाडे दुय्यम निरीक्षक दिपक सुपे, निरीक्षक ए. बी. बनकर, आर. पी. दांगट, संजय विधाटे, तुळशीराम करंजुले, जवान सर्वरी, निहाल उके, सुरज पवार, एन. आर. ठोकळ, शुभांगी आठरे यांनी कारवाई केली.

पुढील तपास निरीक्षक अे. बी. बनकर करत आहेत, अशी माहिती निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्रमांक १, अहमदनगर यांनी दिली आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !