योगिता सुर्यवंशी (MBP Live24) - प्राचीन काळापासून मुलींना भारतीय समाजात मुलांपेक्षा कमी आदर व महत्त्व दिले जाते. चळवळींद्वारे, कायद्याच्या मदतीने स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण पूर्वीपेक्षा जरी कमी झाले असले, तरी हा प्रकार पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही.
(व्हिडीओ पहा)
स्त्रीभ्रूण हत्या हा सामाजिक गुन्हा आहे. याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी नुकताच Y हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
कुठलाही डॉक्टर रुग्णांच्या घरी जाऊन विचारत नाही. सांगू का? मुलगा आहे की मुलगी? आणि मुलगी आहे तर करू का गर्भपात?' हा 'वाय' सिनेमातील संवाद समाजाच्या बुरसटलेल्या विचारसरणीचं दर्शन घडवतो.
गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणारा डॉक्टर जितका दोषी आहे; तितकंच ते कुटुंब, तो समाज, तो पुरुष आणि वेळ पडल्यास ती स्त्रीदेखील दोषी आहे. हे या सिनेमातून दिसून येते.
सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत मुक्त बर्वे, नंदू माधव दिसतात. तसेच प्राजक्ता माळी आणि संदीप पाठकही दिसतात. या सिनेमाचं लेखन अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ आणि संदीप दंडवते यांनी केले आहे.
या सिनेमाचा रिव्ह्यु वरील व्हिडीओत पहा. आणि आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा..