अक्षता पडल्या,
तुझ्या आईला
माझा रंग आवडलाच नाही,
तु फेअर & लव्हली दिलेस मला...!
नातेवाईकांना फारच लुकडी वाटले,
तु सोबत न्यायचं टाळत गेलास..!
मी आई झाले,
आनंदाचा फुगा आकाशी गेला,
तु पटकन टाचणी लावत म्हणालास,
शोभत नाहीस आता मला..!
रंग, रुप, शरीर यापलीकडे बाईच्या
शरीरात असतं एक माणसाचं मन,
हेच कस तू विसरलास..!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापुर)