नगर शहराची अमृत योजना. प्रदीर्घ काळ रेंगाळलेली अमृत योजना. यामध्ये माननीय महापौर, पदाधिकारी यांची काहीच चूक नाही. अक्षम्य चूक आहे ती हा विभाग सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांची.
अमृत योजनेच्या नळातील सारं अमृत निघून गेलं, तरी अजून ही योजना चालूच आहे. मोठ्या थाटामाटात सूरू झालेलं हे काम २०१२ मधेच पुर्ण होणारं होतं. तसा करारही होता. त्यानंतर जितके दिवस उशीर होईल तितके दिवस ठेकेदाराला दंड होता.
हा दंड तर दूरच राहिला. परंतु या अमृत योजनेचा गवगवाच जास्त झाला. ही योजना पुर्ण झाली, तर थेट दुसऱ्या मजल्यावर सुद्धा योग्य दाबाने पाणी येणार होते. पण काय गंमत आहे.?
याबाबतीत एकही नगरकर बोलत नाही. किती दुर्दैव आहे या शहराचे. या योजनेचे पाइप कुठे बसवले अन् किती बसवले हे सुद्धा ठेकेदार विसरूनही गेला असेल. बिल मात्र याला वेळच्या वेळी व्यवस्थित मिळत असेल.
असा प्रकार फक्त याच शहरात होऊ शकतो. करोडो रुपयांच्या या योजनेचं कोणतं असं सुख शहरातील नागरिकांना मिळालं.? किती पैश्याचा चुराडा झाला अन् किती पैसा कोणाच्या खिशात गेला.? अहो हा सारा पैसा तुमचा आमचा आहे हे विसरू नका.
या लोकांवर यापूर्वीच कठोर कारवाई व्हायला हवी होती. पण तसे होत नाही. कारण यालाच नगर म्हणतात. आयुष्यभर अमृत योजनेची चर्चा होेत राहिल. अन् आपण टाळ्या वाजवत राहायच्या. मुंगेरीलाल के हसीन सपने. दुसरे काय..?
- जयंत येलुलकर (माजी नगरसेवक, नगर)