तुमच्याकडे आहे का निरोगी आयुष्याची 'ही' गुरुकिल्ली..?

तुम्हाला ऐकून गंमत वाटेल.. पण तुमच्या शरीरात तुमच्या वजनाचा तिसरा भाग हे जिवाणू असतात. तुम्ही म्हणाल.. हे काय सांगताय.? पण होय, हे सत्य आहे.

शरीरातील वजनाच्या तिसरा भाग म्हणजे तुमचे वजन जर साठ किलो असेल तर तिसरा भाग म्हणजे वीस किलो बॅक्टेरिया किंवा जिवाणू आहेत. आणि विशेष म्हणजे हे आपल्या शरीरातील अनेक क्लिष्टपचनाच्या कार्यात मदत करतात.

जे आपले शरीर तयार करू शकत नाही असे अत्यावश्यक जीवनसत्वे म्हणजेच व्हिटॅमिन बनवतात. आहे की नाही गंमत.?

महत्वाचा भाग काय, की आजारी पडल्यानंतर आपल्याला स्ट्रॉंग अँटिबायोटिक्स सारखी औषधे दिली जातात. त्यामुळे चांगले आणि वाईट दोन्ही जिवाणू नष्ट होतात. तेव्हा चांगले जिवाणू परत मिळवण्यासाठी प्रो बायोटिक्स दिले जातात.

परंतु अन्नातून देखील आपण ते मिळवू शकतो. दूध, दही, ताक, केळी, आंबवलेले पदार्थ, इडली, डोसा, नैसर्गिक आंबटगोड फळे.. इत्यादी आपल्याला असे आपले मदत करणारे जिवाणू परत देतात.

कारण आतड्यातील हे मदतनीस.. क्लिष्ट पचनाचे कार्य करतात. अनेक गरजेची अमिनो आम्ले बनवतात. व्हिटॅमिन के सारखे हृदयाचे संरक्षण करणारे जीवनसत्व बनवतात.

म्हणून आहार हेच औषध आहे. श्वास (दीर्घ श्वसन) शुध्द आहार. योग्य निद्रा,थोडासा योगा. थोडासा व्यायाम.. हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे. ही किल्ली आपल्याजवळ असलीच पाहिजे.

- डॉ. मानसी पाटील (पुणे)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !