लढा द्यावाच लागतो. तरच विजयाचा उत्सव साजरा करण्यात मजा आहे..

कोणताही विजय लढल्याशिवाय मिळत नाही आणि प्रत्येकाची लढाई वेगळी असते. विजयादशमीचा सण साजरा करताना हे विसरू नये.. रामाला वनवास घरातील चुकीच्या निर्णयामुळे झाला.. आणि त्याला खडतर आयुष्य भोगावे लागले.

पवित्र सीतेच्या पदरी खडतर आयुष्य आणि अग्नीपरिक्षा आली. पांडवांना देखील स्वतःच्याच घरच्यांशी लढावे लागले. सीमोल्लंघन करताना. नेमक्या कोणत्या सीमा ओलांडायच्या आहेत, याचा प्रत्येकाने अभ्यास करावा.

विजयादशमी साजरी करूया.. नक्कीच करूया. परंतु आपापली लढाई ओळखून. सण म्हणजे फक्त अपट्याची पाने वाटणे.. मिठाई बनवणे.. किंवा झेंडूच्या फुलांच्या आणि आंब्याच्या पानांच्या माला लावणे. कोणी कोणी राम रावण प्रतीकात्मक आहेत हेच विसरून जातात..

त्यापासून काय बोध घ्यायचा.. आपल्या पूर्वजांना नेमके आपल्याला काय सांगायचे आहे, हे ओळखता आले पाहिजे. नाहीतर अजूनही कितीतरी राम रावण आणि पांडव अवती भोवती आहेत. किती तरी भाऊबंदकी चालू आहे..

शेवटी काय तर वाईट कशाला म्हणायचे हे ठरवायचे.. पूर्वी कधी काळी लाच देणे, हफता देणे याला वाईट म्हणत होते. नाहीतर एकीकडे दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायच्या आणि दुसरीकडे कोणालातरी लुटून खायचे. राम आणि रावण एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे.

असे वागणे अर्थहीन आहे. एकीकडे नवरात्र साजरा करायचं, अगदी उपवास करून आणि दुसरीकडे घरातील स्रीला मारहाण करायची.. इतर स्रियांकडे चुकीच्या नजरेने पाहायचे. आपल्यातच किती वेगवेगळ्या प्रवृत्ती असतात.

पूर्वीची खेडी फक्त अन्न धान्य, दूध दुभते यांनी समृद्ध नव्हती.. तर माणुसकी, माया, आपलेपणा, स्नेह.. यांनी देखील भरभरून वाहत होती. आजची आपली लढाई योग्य वेळी ओळखून विजयश्री खेचून आणली पाहिजे. तरच खरं दसरा साजरा होईल.

विजय, यश, फुकट मिळत नाही. लढा द्यावाच लागतो. तरच विजयाचा उत्सव साजरा करण्यात मजा आहे. विजयादशमीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आयुष्याच्या लढ्यात विजयी व्हा..!!

- डॉ. मानसी पाटील (पुणे)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !