नाशिक - युनिक ब्रेन अकॅडमीतर्फे आयोजित युनिक प्रीमिअर लीगच्या अंतिम क्रिकेट सामान्यांचा थरार उद्या (रविवार, ता : १२ फेब्रुवारी) सकाळी ठीक ८ वाजता गामणे ग्राउंड, पाथर्डी फाटा येथे अनुभवयास मिळणार आहे.
चार संघ, दोन सिमिफायनल, एक फायनल - पहिल्या 10 मिनिटात 4 संघ निवडून प्रत्यक्ष सामन्यास सुरुवात होईल. प्रत्येक दोन संघात सिमि फायनल मॅच होईल. यातील विनर दोन संघात अंतिम लढत होऊन फायनल विनर संघास विजेतेपद प्राप्त होईल.
यांना मिळणार मेडल्स, ट्रॉफी - या तिन्ही सामन्यात बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि बेस्ट कीपर यांना प्रत्येकी मेडल प्रदान केले जाईल. तसेच अंतिम विजेत्या संघास फिरता चषक दिला जाईल.
भव्य पारितोषिक वितरण - नुकत्याच झालेल्या नॅशनल अबॅकस कॉम्पिटिशनमध्ये बाजी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल, वैयक्तिक बक्षिसे, ट्रॉफी, मेडल, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.
यासाठी रविवारी २६ फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन केले जाणार आहे. याच समारंभात युनिक प्रीमिअर लीग च्या विजेत्या संघास फिरता चषक देऊन, तर वैयक्तिक मेडल्स देऊन गौरविण्यात येणार आहे.