अहमदनगर - लना होशिंग विद्यालयाच्या 1992 च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हॉटेल संकेत येथे उत्सवात पार पडला. 31 वर्षांनी एकत्र आलेल्या जुने मित्र मैत्रिणींनी या स्नेह मेळाव्यात हजेरी लावून आपला शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. तर विविध खेळात रममान होऊन पुन्हा बालपणीच्या जीवनात रममाण होत धमाल केली.
सन 1992 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी लना होशिंग विद्यालयाच्या शाळेला भेट देऊन स्नेह मेळाव्याचे प्रारंभ केले शाळेची शिस्त व झालेल्या शैक्षणिक संस्कारामुळे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असल्याची भावना माजी विद्यार्थिनी व्यक्त करीत शाळेचे ऋण व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी अमोल फुटाणे यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी माजी विद्यार्थिनी रेश्मा पोकळे, जयश्री बोराटे, शीला तरटे, निलय गायवाड, वर्षा कोठारी, स्वाती हाडके, हेमा जाधव, चंदा भंडारी, निर्मला अब्दुले, वर्षा अरोरा, जयश्री भुजबळ, राहुल सिंघवी, सचिन देशमुख, महेंद्र वाघ, योगेश धोकटे, वैभव साळवे, गिरीश काथोटे, गणेश मासाळ, किरण अनपट, आशिष पाठक, राम देशपांडे, संतोष पंडित हजर होते.
जुन्या मित्राची सर कशातच येत नाही हेच या ग्रुपचं व गेट-टुगेदरचे आकर्षण आहे. सर्व ग्रुपने अमोल फुटाणे यांचे आभार व्यक्त केले. व "दुनिया होवो कितीही मोठी. लहानपण तू सोडू नको. खेळ रंगला बालपणाचा अर्ध्यावरती सोडू नको" या ब्रीद वाक्याला म्हणत सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र आले.