अहमदनगर - उसनी घेतलेली रक्कम परत करण्यासाठी दिलेले धनादेश न वटल्याच्या दोन प्रकरणातुन कैलास भोसले यांची येथील न्यायदंडाधिकारी यांनी निर्दोष मुक्तता केली आहे, अशी माहिती ऍड. सचिन घावटे यांनी दिली.
शिव ग्लास अँण्ड अल्युमिनीयमचे मालक कैलास भोसले (रा. गुलमोहर रोड) यांनी एका व्यक्तीकडून दिड लाख रूपये उसने घेतले होते. या रकमेच्या परतफेडीपोटी कैलास भाेसले यांनी त्यांना ४४ हजार रुपयांचा एक तर १ लाख २० हजार रुपयांचा दुसरा धनादेश दिला होता.
उसने पैसे परत घेण्यासाठी संबंधीत व्यक्तीने दोन्ही धनादेश बँकेत भरले. मात्र ते दोन्ही धनादेश न वटता परत आले. यामुळे त्यांनी कैलास भाेसले यांच्याविरूध्द कोर्टात दोन केसेस दाखल केल्या. या केसमध्ये आरोपीतर्फे ऍड. सचिन घावटे यांनी काम पाहिले.
धनादेश सादर करण्याच्या दिनांकास आरोपी हा रक्कम कायदेशीर देणे लागत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच सुरक्षेपोटी घेतलेल्या धनादेशचा वापर करून तो बँकेत वटण्यास टाकल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले.
या दोन्ही बाबी लक्षात आल्यानंतर, तसेच गुन्ह्यातील इतर मुद्दे अभ्यासल्यानंतर न्यायालयाने भाेसले यांची दोन्ही केसमधुन निर्दोष मुक्तता केली आहे.