येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
नाशिक : येथील युनिक ब्रेन ॲकॅडमीच्या सिडको मधील चारही ब्रँचेसच्या ॲबॅकसमधील विविध लेव्हल पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला. सिडकोतील माणिकनगर येथील ॲकॅडमीच्या ब्रँच ऑफिस मध्ये रविवारी, ता. 28 जानेवारी रोजी हा दिमाखदार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा विभागातील निवृत्त अधिकारी साळी साहेब, लष्करातील निवृत्त हवालदार जाधव साहेब, युनिक ब्रेन ॲकॅडमीचे सर्वेसर्वा सुरेश धोंडीबा अनपट व सौ. कुसुम अनपट उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थ येवला साहेब यांनी भूषविले.
नृत्याविष्काराने सर्वच मंत्रमुग्ध : कार्यक्रमावेळी विविध सिनेगीतांच्या तालावर विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आणि समूह नृत्याद्वाचे सादरीकरण केले. यावेळी सादरीकरण करणाऱ्यासोबत सर्वच विद्यार्थ्यांनी संगीतावर ठेका धरत मोठा जल्लोष केला. प्रमुख पाहुण्याना देखील मोह आवरता न आल्याने त्यांनीही टाळ्यांचा उतूंग प्रतिसाद देत आनंद लुटला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील मुलांसह नागरिकांनीही गर्दी केली होती.
सिडकोत दबबा : सिडकोमधील चारही ब्रँचचे संचालक श्री. गणेश अनपट आणि सौ. कल्पना अनपट यांच्या मार्गदर्शाखाली स्टुडंट्स ने हे उतुंग यश संपादित केले. या परिसरातील ॲबॅकस प्रशिक्षणासाठी विद्यार्थी आणि पालकांची वाढती मागणी लक्षात घेऊन माणिकनगर भागात पहिली ब्रँच सुरू केली. या ठिकाणी विद्यार्थी आणि पालक यांच्या समाधानकारक प्रतिक्रियांच्या जोरावर पवननगर, माऊली लॉन्स परिसर, येथे आणखी तीन ब्रँच सुरू केल्या. याठिकाणी देखील मोठा प्रतिसाद लाभत असून या यशस्वी कामगिरीच्या माध्यमातून सिडको परिसरात ॲकॅडमीचा दबदबा वाढत आहे.
'युनिक'च्या यशाचा आलेख असाच उंचवा : सौ. आशा अनपट : सिडको विभागातील या दोन्ही संचालकांसह यशस्वी विद्यार्थ्यांचे युनिक ब्रेन ॲकॅडमीच्या डायरेक्टर सौ. आशा अनपट यांनी अभिनंदन केले. यापुढेही याच प्रकारे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून त्यांच्या यशाचा आलेख उंचावून युनिक ब्रेन ॲकॅडमीची पताका सर्वदूर फडकवत राहो, असे आवाहन दोन्ही संचालकांना केले.
नाशकातील 16 ब्रँचसह देश - विदेशात झेंडा : ॲड. उमेश अनपट : पाथर्डी फाटा येथील ज्ञानेश्वर नगर येथील युनिक ब्रेन ॲकॅडमीच्या पहिल्या ब्रँच च्या माध्यमातून नाशिक शहरात मुहूर्तमेढ रोवण्यात आली. सध्यस्थितीत नाशिक शहरातील पाथर्डी फाटा, इंदिरानगर, राजीव नगर, अशोका मार्ग, पांगरेमळा, गोविंद नगर आदी ठिकाणी मिळून एकूण 16 ब्रँच यशस्वीरित्या पुढे मार्गक्रमण करत आहेत. याशिवाय महाराष्ट्रात, देशात आणि विदेशातील फ्रांचायसीच्या जोरावर युनिक ब्रेन ॲकॅडमीने अटकेपार आपला झेंडा रोवला असल्याची माहिती यावेळी ॲकॅडमीचे फाऊंडर डायरेक्टर ॲड. उमेश अनपट यांनी दिली. सर्व यशस्वी विद्यार्थी आणि दोनही संचालकांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- हे देखील वाचा
युनिक माईंड | विद्यार्थी आणि पालक समुपदेशनाने 'हे' होईल साध्य..