अहमदनगर - पालकमंत्री राधाकृष्ण विखे खासदार सुजय विखे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर ३.२५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन समारंभ खासदार विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
खासदार विखे म्हणाले, नगर शहरासाठी मोठा निधी दिलेला आहे. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिरांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक २२ जानेवारी रोजी संपन्न होत आहे. हा उत्सव दिवाळीसारखा साजरा करावयाचा आहे.
या कार्यक्रमास प्रभागातील नागरिकांची उपस्थित होते. आपण ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतो त्या भागातील जनता सुखी व आनंदी राहावी, असे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य ठरते, असेही ते म्हणाले.