चला चला महिला दिनाची वेळ झाली.. महिलांचे कौतुक करायची वेळ आली. वर्षातले ३६५ दिवस त्यांचे असतात. उगाच का एक दिवस महिलांचे गोडवे गातात..?
मॅडम याल का आमच्याकडे महिला दिनाचे भाषण ठोकायला..? तुमचं कार्य लईच महान, मुलाखत द्याल का आमच्या पेपरला.? वेगळ्या वाटेने चालणाऱ्या महिला.. यात सत्कार करणार आहोत, याल का सत्काराला.?
आमच्या मंडळाच्या वतीने महिलांचे 'एचबी' तपासणी ठेवलीय.. आमच्या मंडळाच्या कामावर जरा लिहाल का.? अशा उपक्रमांना याल का, अन् तशा उपक्रमांना उपस्थिती लावल का..?
अरे हो, हो... किती कॉल आणि किती मेसेज.. बाकी दिवस तिला मठ्ठ म्हणणार.. तिच्यावरचे फालतू जोक्स फॉरवर्ड करून विकृत मजा घेणार.. जस्ट विनोद म्हणून घ्या हो, असे म्हणत दाताडे काढणार.. आले मोठे महिला दिन साजरे करणारे.. आधी माणूस समजा तिला.
उभे रहा तिच्यासाठी घरीदारी
लिंगभेदाची पार करा ही दरी...!
सोबत आहोत उड्डाण घे पोरी..
असं म्हणून तर पहा खरी...!
मग महिलांची अस्मिता
खऱ्या अर्थाने होईल साजरी...!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)