बेभान वारा.. झाडांची पाने.. मुक्तहस्त चाललेला त्यांचा शिवणापाणीचा खेळ.. अशा निसर्गरम्य वातावरणातील सूख काय वर्णावं..?
शहराजवळील चांदबिबी महालच्या सानिध्यात उंच डोंगरावरील मिळणारा असा आनंद काही विरळाच.. वाऱ्याच्या वेगाने डुलनारी झाडे.. पानांची सळसळ.. जणू कुठे समुद्रकिनारी बसलो आहोत असं वाटून जावं..
या शहरांच्या आसपास अशी कितीतरी सुखावणारी स्थळे आहेत. ज्यांनी जीवन आनंदून जावं. ज्यांना ही ओढ आहे ती येथे येतात.. घटकाभर थांबतात.. सुखावून जातात.
खरंच यावं. अधून मधून यावं.. एक सांगू,
ना आपल्याला कधी चांदबीबी समजली,
ना चांदबीबी महाललाचं सौंदर्य कधी कळलं नाही..!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)