ये जीवन है..
इस जीवन का,
यही है.. यही है..
यही है.. रंग रूप..!
आपला रोजचा जीवन प्रवास.. जगणं.. रोजच नवीन विषय.. नवीन संदर्भ.. कधी हलक फुलकं.. कधी अडचणीचं. मार्ग काढायचा, रस्ता सुकर झाला की दीर्घ श्वास घ्यायचा.
काही क्षण फुलवतात.. काही रिझवतात. ध्येयाकडे जाणाऱ्या वाटा कधी काटेरी असतात. त्यातून तर खरी वाट काढायची असते. माणसं भेटतात.. आपली होतात. नात्यांची वीण अधिक घट्ट होत जाते. काही आवडतात.. काही नकोशी वाटू लागतात..
आशा.. निराशा... रोजचाच खेळ. कुणाचं काहीतरी पटत नाही. अपेक्षाभंग.. "वाटलं नव्हतं कधी असा वागू शकेल..." हे सारं स्वीकारायचं असतं. गालातल्या गालात हसायचं असतं.
एकांतात डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसायचे असतात. अन् जगण्याचे मार्ग हसत हसत शोधायचे असतात. आपल्या अपेक्षा, कुणाच्या आपल्याकडून आशा..
जीवन असंच असतं,
स्वीकारायचं असतं.
सुंदर आहे यार जग,
भेटलेली माणसे ही...
ती सुरुवात होती..
पलीकडे 'एंड' आहे..
एवढंच....!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)