अहमदनगर - श्रीरामपूर तालुक्यातील माऊली प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट संचलित प्राईड अकॅडेमी इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, भेर्डापूर-वांगी महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा इयत्ता १२ वीचा निकाल १०० टक्के लागला आहे.
महाविद्यालयातून १२ वी सुटणाऱ्या विद्यार्थ्यांची ही चतुर्थ बॅच होती. विज्ञान शाखेमध्ये ८६.१७ टक्के गुण मिळवून अनुष्का सुनिल थोरात हिने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यापाठोपाठ अनुक्रमे ८४.०० आणि ७७.३३ टक्के गुण मिळवून वेदांत भरत साळुंके आणि रुचिरा शरद जगदाळे यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले.
माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक माऊली मुरकुटे व प्राईड अकॅडेमीच्या संस्थापिका तथा पंचायत समिती सभापती वंदनाताई मुरकुटे यांनी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महाविद्यालय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक समिती, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस. जी. कोकणे, शाळेच्या मुख्याध्यापिका पी. वाय. गोटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांनी विद्यार्थांच्या प्रगतीचे कौतुक केले असून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.