अहिल्यानगर - आनंद एज्युकेशन सोसायटीच्या आनंद माध्यमिक विद्यालय, गुलमोहर रोड, शाळेचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यालयाने यंदाही आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
यावर्षीच्या निकालात ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या १२ विद्यार्थ्यांनी विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. विराज दीपक रणसिंग याने ९८.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
अस्मिता प्रकाश पालवे हिने ९७% गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांक तन्मय प्रदिप पाडळे (९६.८०%), चतुर्थ श्वेता अण्णासाहेब त्रिंबके (९५.२०%) आणि पुष्कर सचिन शिनगारे (९५%) यांनी मिळवला.
या यशामागे मुख्याध्यापिका शारदा पोखरकर यांचे नेतृत्व असून, शिक्षक बाळकृष्ण हजारे, विठ्ठल बोडखे, पुंजाराम पवार, देवका लबडे, अपर्णा क्षीरसागर, अनिता कोरडे, लीना धसे, सीमा सोले, स्वाती ननावरे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
तसेच शिक्षकेतर कर्मचारी कविता पानसरे, सुहास बोरुडे व ज्योती सब्बन यांचेही विद्यार्थ्यांच्या यशामध्ये लक्षणीय योगदान आहे.