अहिल्यानगर - नेवासा तालुक्यातील सोनई येथील सुजाता इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या शालांत परीक्षेत घवघवीत यश मिळवत सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२५ मध्ये झालेल्या दहावी परीक्षेतील निकालामध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. सृष्टी कृष्णा आंधळे हिने ९३.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
कृष्णा रवींद्र ढगे याला ९३.४०% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळाला तर तनिष्का बाबासाहेब तरवडे हिला ८६.८०% गुण मिळून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या यशस्वी कामगिरीने विद्यालयाचे नाव तालुक्यात आणि परिसरात उज्वल केले असून ग्रामस्थांतून विद्यार्थ्यांचे आणि संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करताना संस्थापक प्राध्यापक किरण सोनवणे आणि प्राचार्य ज्योती सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
या यशामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मोलाचे ठरले. यानिमित्त सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना उज्वल भवितव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.