शिंगवेनाईक येथील हॉटेल दोस्तीमध्ये वेश्याव्यवसाय, पोलिसांचा छापा


अहिल्यानगर – शिंगवेनाईक (ता. अहिल्यानगर) येथील हॉटेल दोस्तीमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत कुंटणखाना चालवणाऱ्या एकास अटक केली असून दुसरा आरोपी फरार आहे.


पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सोपान शिरसाठ (कार्यभार एएचटीयू) यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली.

गोपनीय माहितीनुसार, हॉटेल दोस्ती येथे बल्ली साळवे हा काही महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे समजले. खात्री करण्यासाठी पथकातील पोलिस अंमलदाराला बनावट ग्राहक म्हणून पाठवले गेले.

१८ मे रोजी छापा टाकण्यात आला असता, आरोपी दिपक भाऊसाहेब साळवे (वय ३०, रा. शिंगवेनाईक) हा महिलांमार्फत वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून २१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तपासादरम्यान हॉटेलमध्ये दोन महिलांना सापडले असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बल्ली उर्फ बाबासाहेब साळवे (फरार) व दिपक साळवे हे महिलांना पैशाचे आमिष देऊन देहविक्रीस भाग पाडत होते.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !