मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'या' जिल्ह्यात तातडीची बैठक

येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा

सांगली – राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने सजग राहण्याचे निर्देश दिले. त्यांनी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यावर भर दिला.


बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी खटले निर्दोष सुटण्यामागील त्रुटी दूर करण्याचे, आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या पोलीस ठाण्यांचा आढावा घेण्याचे व सरकारी वकिलांसोबत बैठक घेण्याचे निर्देश दिले. त्यांनी ई-समन्सची प्रभावी अंमलबजावणी, मालमत्ताविषयक गुन्ह्यांत हस्तगत माल परत देण्याचे प्रमाण वाढवण्यावर भर दिला.

महिला बेपत्ता प्रकरणांत विशेष मोहीम राबवण्यास सांगितले. मोटार वाहन कायद्यानुसार स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याचे, दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण ६०-९० दिवसांत वाढवण्याचे आणि झिरो एफआयआरचे नियमित एफआयआरमध्ये रूपांतरण करण्याचेही आदेश दिले.

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश देताना २०१९ मधील महापूराचा अनुभव लक्षात घेऊन योग्य उपाययोजना करण्याचे सांगितले. जिल्हा प्रशासनाने पूरस्थिती व्यवस्थापनासाठी पूर्ण तयारी असल्याचे आश्वासन दिले.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !