भापकर वस्ती शाळेत जल्लोषात शाळा प्रवेशोत्सव; नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण


शेवगाव (अहिल्यानगर) – शासनाच्या शिक्षण विभागाच्या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भापकर वस्ती येथे शाळा प्रवेशोत्सव आज उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.

नव्याने शाळेत दाखल झालेल्या चिमुकल्यांचे सजवलेल्या बैलगाडीतून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. औक्षण करून त्यांच्या पहिल्या पावलांचे ठसे घेत पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ आणि केंद्रप्रमुख रघुनाथ लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात अण्णासाहेब रुईकर, शाळा समितीच्या अध्यक्ष जयाताई भापकर, दीपक पाथरकर, दादासाहेब भापकर, कानिफनाथ तेलुरे, ज्योती औटी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका आरती तागडे व सहशिक्षिका श्रीकांता शिंदे यांनी केले. या वेळी पालकांचीही उत्स्फूर्त उपस्थिती होती.

यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी आणि अभिमान असलेले हृषीकेश बाळासाहेब टेकाळे यांची राज्यसेवा परीक्षेतून गटविकास अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाळेत विशेष सत्कार करण्यात आला.

"अशा गुणवंत विद्यार्थ्यांमुळे जिल्हा परिषद शाळांचे खरे आयकॉन ठरतात," असे गौरवोद्गार मुख्याध्यापिका आरती तागडे यांनी यांनी त्यांच्या सत्कार प्रसंगी काढले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !