बाळासाहेब भारदे हायस्कूलच्या प्राचार्यपदी संजय कुलकर्णी यांची पदोन्नती


शेवगाव (अहिल्यानगर) - राज्यात शैक्षणिक गुणवत्ता व नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, शेवगाव या संस्थेच्या प्राचार्यपदी संजय राजाराम कुलकर्णी यांची नुकतीच पदोन्नती झाली आहे.

त्यांनी दिनांक 1 जून रोजी पदभार स्वीकारला. भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. रमेश भारदे व उपसचिव हरीश भारदे यांच्या उपस्थितीत हा पदभार सोपविण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

गणित विषयाचे तज्ज्ञ असलेले संजय कुलकर्णी हे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांचे कुशल मार्गदर्शक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे शाळेने सुरू केलेल्या गुणवत्ता विकास उपक्रमांमुळे शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक यशाचा मार्ग सापडला आहे.

प्राचार्य म्हणून त्यांच्या निवडीबद्दल श्रीराम धुत, श्यामसुंदर भारदे, रजनीकांत छेडा, प्रल्हाद कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी, गाजीमियाँ काझी यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

प्राचार्य कुलकर्णी म्हणाले, "सर्वांना सोबत घेऊन शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात शाळा, शिक्षक व विद्यार्थी अग्रेसर राहतील, यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे."

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !