सांगली - एकात्मिक बाल विकास सेवा योजना सांगली ग्रामीण प्रकल्पांतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका पाच व अंगणवाडी मदतनीसच्या एका पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
पात्र महिला उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक 18 जून 2025 पर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सांगली ग्रामीण या कार्यालयात कार्यालयीन वेळेत साक्षांकित प्रतीसह समक्ष पोहोच करावयाचे आहेत.
या मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी सांगली ग्रामीण यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
अंगणवाडी सेविका रिक्त पद असलेल्या अंगणवाडी केंद्राचे नाव व क्रमांक व रिक्त पद संख्या पुढीलप्रमाणे -
बुधगाव 46 – 01 पद,
समडोळी 20 – 01 पद
दुधगाव 64, 67 – 02 पदे
सांबरवाडी 122 – 01 पद
काकडवाडी 106 - 01 पद
अटी व शर्ती - उमेदवाराचे वय दिनांक 18 जून 2025 रोजी वय वर्षे 18 वर्षाचे वरील व 35 वर्षाच्या आतील असावे. विधवा महिला उमेदवारासाठी वयोमर्यादा दिनांक 18 जून 2025 रोजी 18 वर्षे पूर्ण व 40 वर्षाच्या आतील राहील.
अंगणवाडी सेविका किंवा मदतनिस पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महिला उमेदवार ही त्या गावची स्थानिक रहिवासी असावी, अशी महत्वाची अट घातलेली आहे.
उमेदवाराने फक्त स्थानिक गावातीलच अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस पदासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. या पदासाठी लहान कुटुंबाची अट लागू राहील, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.