बाळासाहेब भारदे हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पुस्तक देऊन स्वागत; पालकही भारावले


शेवगाव (अहिल्यानगर) – येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात नवे शैक्षणिक वर्ष स्वागतार्ह उत्साहात सुरु झाले. शाळा प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पुस्तक भेट देऊन मनोभावे स्वागत करण्यात आले.

सुसज्ज कमानी, ढोलताश्यांचा गजर आणि आनंदी वातावरणामुळे पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह पालकही भारावून गेले.

कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. रमेश भारदे, सचिव हरीश भारदे, प्राचार्य प्रा. संजय कुलकर्णी व पालक प्रतिनिधी अरविंद पोटफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य प्रा. कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन निलेश मोरे यांनी केले.

पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावी व बारावीचा उज्वल निकाल, शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा व सहशालेय उपक्रमांमधील उल्लेखनीय सहभागामुळे शाळा सातत्याने प्रगतीपथावर आहे.

यंदाच्या वर्षातही विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गुणवत्तेचा विकास साधण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहिती प्राचार्य प्रा. संजय कुलकर्णी यांनी दिली.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !