अहिल्यानगर - राशीन (ता. कर्जत) येथे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका करत १६ लाख ८० हजार रुपये किमतीच्या २६ जनावरांची कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कडक कारवाईचे आदेश मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कामगिरी केली.
१२ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, राशीन येथील आळसुंदा रोड परिसरात सचिन मोहन आढाव व हिरामन उर्फ भाऊसाहेब आढाव यांच्या घराशेजारील जागेत बबलु उर्फ इरफान कुरेशी व त्याचे साथीदार गोवंश जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवत आहेत.
पोलिसांच्या पथकाने तत्काळ छापा टाकून घटनास्थळी २६ गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली. ही जनावरे निर्दयतेने बांधलेली आढळून आली असून, त्यांना अन्न-पाणीही देण्यात आले नव्हते.
याप्रकरणी हिरामन उर्फ भाऊसाहेब आढाव, सचिन मोहन आढाव, बबलु उर्फ इरफान कुरेशी, सादीक कुरेशी आणि समीर कुरेशी (सर्व रा. कर्जत तालुका) हे आरोपी फरार आहेत.
त्यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम व प्राण्यांना निर्दयतेने वागविणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला असून, पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत.
