एल्गार ! महिला व मुलींच्या सन्मानासाठी साताऱ्यात निदर्शने


सातारा – 'महिला व मुलींचा सन्मान हाच देशाचा प्रश्न, सन्मान द्या, सुरक्षितता द्या, समान हक्क द्या' या घोषणांनी आज शिवतीर्थ पोवई नाका परिसर दुमदुमून गेला. साताऱ्यातील महिला व मुली एकत्र येऊन भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.

महिलांच्या सुरक्षेसाठी आणि हक्कांसाठी निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा सुनील शेलार या प्रमुख उपस्थित होत्या.

यावेळी त्यांच्यासोबत पूजा साळुंखे, रेवती भोकरे तसेच चिमुकले कार्यकर्ते ईश्वरी भोकरे आणि मनस्वी साळुंखे यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.

महिलांना समान हक्क, सुरक्षितता आणि सन्मान मिळवून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असून यामधून समाजात जागृती निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !