भारीच ! नासा स्पेस ऍप्स चॅलेंज स्पर्धेला नगरमधून उत्स्फूर्त प्रतिसाद


अहिल्यानगर - गेल्या आठवड्यात नासा (NASA) आंतरराष्ट्रीय स्पेस ऍप्स चॅलेंज (International Space App Challenge) कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमास नगरमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याचे आयोजन नासाचे स्थानिक नेतृत्व हेमंत केदारे (Hemant Kedare) आणि आर्यभट्ट गणित व विज्ञान संस्था यांनी केले होते.


दि. ४ व ५ ऑक्टोबर असे दोन दिवस विद्यार्थी, तंत्रज्ञानाच्या आवडीनिवडी असणाऱ्या लोकांमध्ये या उपक्रमाबद्दल मोठा उत्साह दिसून आला. त्यांनी टीम्स बनवून नासाचे खुले डेटासेट्स (Datasets) वापरून पृथ्वी व अवकाशविषयक (Earth and Space) समस्यांवर उपाय शोधले.

या कार्यक्रमात 'बूटकॅम्प' सेशन भरवले; ज्यात नोंदणी, टीम बनवणे आणि विषयाची रूपरेषा यांचे मार्गदर्शन करण्यात आले. तोडमल कॉमर्स अकॅडमी (Todmal Commerce Academy) व सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टचे (Saturday Club Global Trust) उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले.

कोडिंग (Coding), डेटा व्हिज्युअलायझेशन (Data Visualization) आणि डिझाइन (Design) वापरून सहभागितांनी हवामान, उपग्रह छायाचित्रण, शेती आणि अवकाश प्रणाली सारख्या आव्हानांना प्रोटोटाइप (Prototype) स्वरूपात उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.

स्थानिक पातळीवर उत्कृष्ट काम करणार्या टीम्सना नासाच्या आंतरराष्ट्रीय मूल्यांकनासाठी पुढे पाठवण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. ऋचा तांदूळवाडकर, प्रा. अश्विनी थोरात, टिना इंगळे, भूपाली निसळ व स्नेहल बल्लाळ यांनी केले.

दि. ५ तारखेच्या रात्री बरोबर ११ वाजून ५९ मिनिटांनी या स्पर्धेचा समारोप झाला. यात नगरच्या विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !