अजितदादांच्या 'त्या' शब्दाने उपकेंद्राचे स्वप्न झाले साकार.! अहिल्यानगरच्या शैक्षणिक प्रगतीचा तो ऐतिहासिक क्षण


अहिल्यानगर - माणसाच्या आयुष्यात काही आठवणी अशा असतात, ज्या काळाच्या पडद्याआड न जाता अधिकच गडद होत जातात. आज अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Fule Pune University) बाबुर्डी घुमट (Baburdi Ghumat) उपकेंद्राकडे पाहताना, ३ फेब्रुवारी २०१४ चा तो दिवस आणि त्यावेळची ती तळमळ पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभी राहिली आहे.

हुंडेकरी लॉनवरील (Hundekari Lawn) तो मेळावा - फेब्रुवारी २०१४ ची ती सकाळ... निमित्त होते स्वर्गीय आमदार राजीव राजळे (Rajiv Rajale) यांनी लोकसभा निवडणुकीच्या (Parliament Election) पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या मेळाव्याचे. हुंडेकरी लॉन जनसमुदायाने ओसंडून वाहत होते. 

राजकीय वातावरण तापलेले असतानाच, जिल्ह्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी काही तरुण आणि अनुभवी मंडळी एकत्र आली होती. या सर्वांचे लक्ष होते राज्याचे तत्कालीन नेते नामदार अजित पवार (Ajitdada Pawar) यांच्याकडे.

प्रशासकीय परवानगीसाठी घातले साकडे - जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुण्याला धाव घ्यावी लागू नये, यासाठी बाबुर्डी घुमट येथील उपकेंद्राला शासनाची प्रशासकीय (Government Sanction) परवानगी मिळणे अत्यंत गरजेचे होते.

यावेळी नगरमधील सर्व सिनेट सदस्यांच्या वतीने एक निवेदन अजित पवार यांना देण्यात आले. यावेळी सिनेट सदस्य श्री. प्रशांत गडाख (Prashant Gadakh), श्री. शिवाजी साबळे (Shivaji Sable), डॉ. चौबे, डॉ. अरुण पंधरकर, उपकेंद्र संचालक डॉ. साहेबराव रिंढे आणि डॉ. अशोकराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

एका पत्रातून बदलले जिल्ह्याचे भाग्य - अजितदादांनी त्या निवेदनाचा स्वीकार केला आणि केवळ आश्वासन (Promise) न देता, हा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द दिला. राजकारणाच्या धावपळीतही शैक्षणिक कार्याचा हा ध्यास त्यांनी विसरला नाही.

पुढे त्यांच्याच पाठपुराव्यातून आणि प्रयत्नांतून विद्यापीठ उपकेंद्राला रीतसर मंजुरी मिळाली. आज जेव्हा हे उपकेंद्र दिमाखात उभे आहे आणि हजारो विद्यार्थी तिथे ज्ञानार्जन करत आहेत, तेव्हा १२ वर्षांपूर्वीच्या त्या भेटीची आणि संघर्षाची आठवण मनाला भावूक करून जाते.

एका सहीने आणि एका शब्दाने जिल्ह्याच्या शैक्षणिक नकाशावर 'बाबुर्डी घुमट' हे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. (Memories)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !