अनैतिक संबंधातून उभा राहिला मृत्यूचा कट.! सराईत गुन्हेगार दीपक पोकळे जेरबंद


राहाता (अहिल्यानगर) - राहाता (Rahata) तालुक्यातील शिर्डी (Shirdi) परिसरात अपहरण (Kidnap) झालेल्या एका तरुणाचा अनैतिक संबंध आणि आर्थिक व्यवहारातून थरकाप उडवणारा खून (Murder) झाल्याचे उघड झाले असून, या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

तब्बल पंधरा दिवसांच्या कसोशीच्या तपासानंतर (Investigation) स्थानिक गुन्हे शाखा, (Crime Branch) अहिल्यानगरने दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार दीपक अंबादास पोकळे (Dipak Pokale) याला त्याच्या साथीदारासह अटक (Arrest) करत हा गूढ खून उघडकीस आणला आहे.

अपहरणातून हत्या : गुन्ह्याची थरारक कथा - दि. १० डिसेंबर २०२५ रोजी सचिन कल्याणराव गिधे (रा. शिर्डी) हा साई सुनिता हॉटेल (Hotel Sunita) परिसरात गेला होता. त्याच दिवशी फिर्यादी श्रद्धा गिधे यांना आरोपी प्रविण उर्फ पचास वाघमारे याने फोन करून 'सचिन फार माजला आहे, त्याचे हातपाय काढावे लागतील,' अशी धमकी दिली. त्यानंतर सचिन घरी परतलाच नाही.

पाच दिवसांनी राहाता पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. तपासात उघड झाले की, सचिन गिधे याचे आरोपींशी अनैतिक संबंध (Affair) व आर्थिक व्यवहार होते. याच वादातून आरोपींनी त्याचे अपहरण करून निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर टायर व डिझेलच्या सहाय्याने मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्यात आले.

तपास कसा उघडकीस आला? - पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने सलग १५ दिवस पुणे, नाशिक, मुंबई (खारघर), छ. संभाजीनगर, मालेगाव आदी ठिकाणी तपास केला.

दि. ६ जानेवारी २०२६ रोजी गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाल्यानंतर संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील दगडाच्या खाणीत लपून बसलेल्या दीपक पोकळे व गणेश दरेकर यांना अटक करण्यात आली. सखोल चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिली.

आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल -
  • ₹१५ लाख किमतीची विनानंबर स्कॉर्पिओ गाडी
  • ₹७२ हजार किमतीचे ३ मोबाईल फोन
  • एकूण ₹१५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

दीपक पोकळे : गुन्हेगारीचा काळा इतिहास : दीपक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal) असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, मोक्का व आर्म ॲक्टसह १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिर्डी, राहाता, लोणी, संगमनेर, कोपरगाव परिसरात त्याची दहशत होती.

पोलीस दलाचे आवाहन : दीपक पोकळे याने कोणाकडून खंडणी (Ransom) मागितली असल्यास किंवा त्याच्याविरुद्ध अन्य तक्रारी असल्यास नागरिकांनी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हा संपूर्ण तपास पोलीस अधीक्षक (DSP) सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडला. तर आता गुन्ह्याचा पुढील तपास राहाता पोलीस ठाणे करीत आहेत. या घटनेमुळे गुन्हेगारी विश्वातील आणखी एक धक्कादायक अध्याय उघडकीस आला आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !