कव्वाली ही आत्म्याशी संवाद साधणारी सूफी परंपरा : डॉ. कमर सुरुर

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर - कव्वाली (Kawwali) ही केवळ गायनकला नसून सूफी (Sufi) विचारधारेतून जन्मलेली, माणसाच्या आत्म्याशी (Soul) थेट संवाद साधणारी आध्यात्मिक परंपरा आहे. प्रेम, भक्ती, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारी ही कला आजही समाजाला एकत्र आणण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कमर सुरुर (Dr. Kamar Surur) यांनी केले.

हैदराबाद (Hyderabad) येथील प्रसिद्ध कव्वाल परवेज हुसेन निजामी (Parvez Hussain Nizami) हे एका साहित्यिक व सांस्कृतिक सूफी कार्यक्रमानिमित्त अहिल्यानगर येथे आले असता, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद (Urdu Literature), मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व रहमत सुलतान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. कमर सुरुर यांच्या हस्ते परवेज हुसेन निजामी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युनुसभाई तांबटकर, आबीद दुलेखान, सदाकत हुसैन, परवेज शेख, आरिफ सय्यद, राजुभाई शेख, जावेद मास्टर, अबरार शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सुरुर पुढे म्हणाल्या की, कव्वाली ही अमीर खुसरो (Amir Khusro) यांच्या परंपरेतून विकसित झालेली कला असून, तिने प्रेम, बंधुता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात कव्वाली माणसाला अंतर्मुख होण्याची संधी देते. परवेज हुसेन निजामी यांसारखे कलाकार (Artist) ही परंपरा जपत ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य करत आहेत.

अशा साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक विचार रुजतात, उर्दू भाषा व सूफी संस्कृतीचे संवर्धन होते, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कव्वाली कलेचा मनमुराद आनंद घेतला.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !