येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
मुंबई - दि. ७ जानेवारी रोजी चांदीच्या (Silver) दराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, चांदीचा दर आज २ हजार ८९४ रुपयांनी वाढून २ हजार ४६ हजार ४४ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. काल हा दर २ लाख ४३ हजार १५० रुपये प्रति किलो होता. त्यामुळे चांदीने आज नवा विक्रम (New Record) नोंदवला आहे.
दुसरीकडे, सोन्याच्या (Gold) दरात आज थोडी घसरण पाहायला मिळाली. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ४५ रुपयांनी कमी होऊन १ लाख ३६ हजार ६१५ रुपयांवर आला. यापूर्वी तो १ लाख ३६ हजार ६६० रुपये होता. मात्र, २९ डिसेंबर २०२५ रोजी सोन्याने १ लाख ३८ हजार १६१ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता.
२०२५ या वर्षात सोनं आणि चांदी दोन्ही मोठ्या प्रमाणात महाग झाली आहेत. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत ५७ हजार ३३ रुपये म्हणजेच सुमारे ७५ टक्के वाढ झाली. तर चांदी तब्बल १ लाख ४४ हजार ४०३ रुपये म्हणजेच १६७ टक्क्यांनी महागली आहे.
तज्ज्ञांच्या मते, डॉलर कमकुवत होणे, भू-राजकीय तणाव आणि विविध देशांकडून सोन्याची साठवणूक ही सोन्याच्या दरवाढीची प्रमुख कारणे आहेत. तर सौर ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील वाढती मागणी आणि जागतिक पुरवठ्यातील कमतरता यामुळे चांदीच्या दरात तेजी आहे.
दागिने विक्रेत्यांच्या मते, येत्या काळात चांदी २.७५ लाख रुपये प्रति किलोपर्यंत, तर सोने १.५० लाख रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाऊ शकते.

