येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
नवी दिल्ली - देशातील जनगणनेचा पहिला टप्पा 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबवला जाणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या टप्प्यात घरांची यादी तयार करणे आणि घरांशी संबंधित माहिती गोळा करणे हे मुख्य काम असेल. प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशात ही प्रक्रिया 30 दिवसांत पूर्ण केली जाणार आहे.
MHA नुसार, 1 एप्रिलपासून देशभरातील सर्व घरे व कुटुंबांची नोंद घेतली जाईल. याआधी 15 दिवसांचा सेल्फ एन्यूमरेशनचा पर्याय नागरिकांना देण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, कोरोनामुळे पुढे ढकललेली 2021 ची जनगणना आता 2027 मध्ये पूर्ण केली जाणार आहे.
जनगणनेची ठळक वैशिष्ट्ये
- यावेळी जनगणना पूर्णपणे डिजिटल असेल.
- सुमारे 30 लाख कर्मचारी मोबाइल ॲपद्वारे माहिती संकलित करतील.
- Android व iOS दोन्ही प्रणालींवर ॲप उपलब्ध असतील.
- रिअल टाइम डेटा ट्रान्सफरमुळे प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर पेपरलेस होईल.
- स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातीआधारित माहिती डिजिटल स्वरूपात गोळा केली जाईल.
- ‘डिजी डॉट’ प्रणालीचे फायदे
- आपत्ती व्यवस्थापनात अचूक मदत
- मतदारसंघ परिसीमन प्रक्रियेला गती
- शहरी नियोजन अधिक प्रभावी
- शहरीकरण व स्थलांतराचा अचूक डेटा
- मतदार यादीतील डुप्लिकेट नावे काढण्यास मदत
2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या सुमारे 121 कोटी होती. जनगणना 2027 मुळे देशाच्या लोकसंख्येचा, सामाजिक रचनेचा आणि विकासाच्या गरजांचा अद्ययावत व अचूक डिजिटल नकाशा उपलब्ध होणार आहे.

