वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त


अहिल्यानगर - जिल्ह्यात अवैध वाळू उपसा (Illegal Sand Mining) आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी कंबर कसली आहे. राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला जेरबंद केले. 


ट्रॅक्टरसह (Tractor) ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ​गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा
​पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (DSP Somnath Gharge) यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.

यानुसार पोनि किरणकुमार कबाडी (PI Kirankumar Kabadi) यांच्या मार्गदर्शनाखाली पथक राहुरी परिसरात गस्त घालत असताना, त्यांना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली.

शेरीचिखलठाण (Sheri Chikalthan) गावच्या शिवारातील वनविभागातून एका ट्रॅक्टरद्वारे वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याचे समजताच पोलिसांनी शेरीचिखलठाण ते संगमनेर (Sangamner) रस्त्यावर सापळा (Trap) लावला.

आरोपी ताब्यात, मालक फरार : ​सापळा लावून थांबलेल्या पोलिसांनी एका विना क्रमांकाच्या लाल रंगाच्या ट्रॅक्टरला अडवून चालकाची चौकशी केली. पोलिसांनी विचारपूस केली असता त्याचे नाव सुनील रेवजी भुतांबरे (वय २१, रा. सुतारवाडी, शेरीचिखलठाण) असल्याचे सांगितले.

त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना (License) मिळून आला नाही. अधिक तपासात हा ट्रॅक्टर जमीर पिरन सय्यद (रा. शेरीचिखलठाण) याच्या मालकीचा असल्याचे समोर आले आहे. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच मालक जमीर सय्यद घटनास्थळावरून फरार झाला.

​जप्त केलेला मुद्देमाल :
  • ​ट्रॅक्टर व ट्रॉली (५ लाख रुपये)
  • ​१ ब्रास वाळू (१० लाख रुपये)
  • ​एकूण मुद्देमाल : ५,१०,००० रुपये

​याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार भगवान बाळासाहेब थोरात यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम व पर्यावरण कायदा कलम ३/१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, रमीराजा आत्तार, भगवान थोरात, विशाल तनपुरे आणि चालक महादेव भांड यांच्या पथकाने केली.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !