नेवासा (अहिल्यानगर) - येथील प्रभू विश्वकर्मा मंदिरात शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी 'विश्वकर्मा जयंती' सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधव एकत्र येणार आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा : शनिवारी सकाळी ठीक ९:३० वाजता प्रभू विश्वकर्मा मंदिरात विधीवत महापूजा संपन्न होईल. त्यानंतर प्रभू विश्वकर्मांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रमुख उपस्थिती: या कार्यक्रमाला विभागीय अध्यक्ष राजकुमार राऊत, जिल्हाध्यक्ष प्रसाद गडकर, माजी राज्य सचिव भाऊसाहेब राऊत, आदिनाथ भालेकर, प्रभाकर राऊत, अशोक गोरे, राज्य प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत आणि ॲड. किरण मोरे यांसह इतर मान्यवर उपस्थित राहतील.
नियोजन आणि आवाहन : हा सोहळा यशस्वी करण्यासाठी रवींद्र मोरे (तालुकाध्यक्ष), संचेत प्रधान (उपतालुकाध्यक्ष), अनिकेत गवळी, वैष्णव यशवंत, ज्ञानेश्वर नांगरे, हरिहर नांगरे, बाळासाहेब भाग्यवंत, नानासाहेब साळुंके, ऋषिकेश भालेकर, बाळासाहेब सांगळे आणि गोपी मुनमूने हे विशेष परिश्रम घेत आहेत.
नेवासा आणि परिसरातील सर्व पदाधिकारी व समाज बांधवांनी या जयंती उत्सवात आणि मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच सर्वांनी आपापल्या घरी भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेची पूजा करावी, असे आवाहन विश्वकर्मा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
