अनोखी 'गुढी'! भापकर वस्ती शाळेत पहिल्याच दिवशी ११ नव्या विद्यार्थ्यांचा प्रवेश


शेवगाव (अहिल्यानगर) - राज्यात पटसंख्येअभावी मराठी माध्यमाच्या (Marathi Medium) सरकारी शाळा (Government Schools) बंद पडण्याचे संकट उभे असताना, शेवगाव तालुक्यातील भापकर वस्ती जिल्हा परिषद (Bhapkar Wasti ZP School) शाळेने मात्र गुणवत्तेच्या जोरावर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

गुढीपाडव्याचे (Gudhipadava) औचित्य साधून या शाळेने इयत्ता पहिलीत नवीन प्रवेश घेतलेल्या ११ विद्यार्थ्यांच्या रूपाने 'प्रवेशाची अनोखी गुढी' उभारून मराठी शाळेची पताका फडकवली आहे. भापकर वस्ती शाळेने राबवलेले शैक्षणिक गुणवत्ता विकासाचे प्रकल्प, पर्यावरणपूरक परिसर आणि सांस्कृतिक व वाचन संस्कृतीचे उपक्रम यामुळे ही शाळा तालुक्यात अग्रगण्य (Leading) ठरली आहे.

विशेष म्हणजे, आजूबाजूची गावे आणि शेवगाव (Shevgoan) शहरातूनही पालक आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेश देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा कल वाढत असताना, भापकर वस्ती शाळेने आपल्या दर्जेदार शिक्षणामुळे इंग्रजी शाळांमधील (English Medium School) विद्यार्थी सुद्धा सरकारी मराठी शाळेकडे खेचून आणले आहेत.

या यशाचे कौतुक करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ यांनी शाळेला भेट दिली. त्या म्हणाल्या, "अनेक ठिकाणी वस्ती शाळा पटसंख्येअभावी बंद होत आहेत आणि शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत, अशा परिस्थितीत भापकर वस्ती शाळेचे हे यश अत्यंत कौतुकास्पद आहे. शिक्षकांचे समर्पण आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ या बळावरच हे शक्य झाले आहे."

यावेळी केंद्रप्रमुख रघुनाथ लबडे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोहिदास बोडखे यांनीही शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापक आरती तागडे आणि सहशिक्षिका श्रीकांता शिंदे यांच्या विशेष परिश्रमांचे आणि कल्पक उपक्रमांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !