अहिल्यानगर - नुकत्याच जाहीर झालेल्या प्रतिष्ठित ऑलिंपियाड परीक्षेच्या (Olimpiyad Exam) निकालात आरव भावना धनवटे (Aarav Bhavana Dhanwate) याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत त्याने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
आरव हा ज्ञानसंपदा इंग्लिश मिडियम स्कूल (Dnyansampada English Medium School) तपोवन रोड, अहिल्यानगर या शाळेचा विद्यार्थी आहे. सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार असलेल्या आरवने या परीक्षेसाठी विशेष परिश्रम घेतले होते. गणितातील क्लिष्ट उदाहरणे सोडवणे आणि वैज्ञानिक संकल्पना स्पष्टपणे मांडणे या गुणांमुळे त्याने हे यश खेचून आणले. त्याने परीक्षेत नववा क्रमांक (Rank) पटकावला आहे.
आपल्या या यशाचे श्रेय आरवने आपल्या पालकांना आणि शिक्षकांना दिले आहे. शाळेतील शिक्षक (School Teacher) शारदा उगले यांनी त्याला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. परीक्षेचे स्वरूप, वेळेचे नियोजन आणि प्रश्नांची अचूक उत्तरे कशी शोधावीत, याचे प्रशिक्षण त्याला या शिक्षकांकडून मिळाले.
आरवच्या या यशामुळे शाळेच्या मुख्याध्यापिका (Head Mistress) शिवांजली अकोलकर यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे. यासोबतच शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी आरवचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
आरवच्या या यशामुळे आमच्या शाळेचा मान वाढला आहे, अशा भावना त्याच्या शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत. आरव हा विमा पाॅलिसी एजंट बाळासाहेब धनवटे यांचा नातू, तर न्यू आर्टस् कॉलेजमधील शिक्षिका भावना धनवटे यांचा मुलगा आहे. त्याने मिळवेलल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
