नवनियुक्त प्रधान जिल्हा न्यायाधीश शिवाजी कचरे यांचा मोहटा देवस्थानतर्फे सन्मान


अहिल्यानगर - येथे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून नुकतेच  शिवाजी कचरे रुजू झाले आहेत. श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष या नात्याने, देवस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित स्वागत व सन्मान करण्यात आला.

अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण पदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल मोहटादेवी देवस्थानचे विश्वस्त ॲड. विक्रम वाडेकर यांनी कचरे यांची सत्कार भेट घेतली. यावेळी वाडेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

शिवाजी कचरे हे मोहटादेवी देवस्थानसह श्री साईबाबा संस्थान, शिर्डी या मोठ्या देवस्थानांचेही पदसिद्ध अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. या भेटीदरम्यान देवस्थानच्या विविध सामाजिक उपक्रमांबाबत आणि भाविकांच्या सोयीसुविधांबाबतही चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी न्यायालयीन कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !