घोडेगावात घुमणार 'श्रीराम' नामाचा जयघोष ! भव्य शोभायात्रा आणि कीर्तनाचा भक्तीमय उत्सव

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

घोडेगाव (नेवासा) - श्रीराम नवमी उत्सव समिती, घोडेगाव यांच्या वतीने यावर्षी 'श्रीराम नवमी उत्सव-२०२६' (Shriram Navami) निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, २५ मार्च आणि गुरुवार, २६ मार्च असे दोन दिवस हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. यादरम्यान कीर्तन सोहळा आणि भव्य शोभायात्रा आकर्षणाचे केंद्र असणार आहेत.


या उत्सवाचा प्रारंभ बुधवार, दिनांक २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजता होईल. मारुती मंदिरात भागवताचार्य साध्वी ह.भ.प. आरतीताई शिंदे (शिव कृष्ण गुरुकुल, भोकर) यांचा सुश्राव्य कीर्तन सोहळा रंगणार आहे. याप्रसंगी मच्छिंद्र भास्करराव कदम आणि भाऊसाहेब श्रीधर सोनवणे यांच्या हस्ते संतपूजन करण्यात येईल. कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

भव्य शोभायात्रा आणि महाआरती : गुरुवार, दिनांक २६ मार्च २०२६ रोजी प्रत्यक्ष रामनवमीच्या दिवशी दुपारी १२:०९ वाजता प्रभू श्रीरामाची विधीवत पूजा व महाआरती होईल. त्यानंतर सायंकाळी ५:३० वाजता हनुमान चालिसा पठण आणि रामजप केला जाईल.

या सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम म्हणजे सायंकाळी ६ वाजता निघणारी ‘भव्य शोभायात्रा’. ‘शनिचौफुला’ येथून या शोभायात्रेचे प्रस्थान होणार असून संपूर्ण घोडेगाव परिसरात प्रभू श्रीरामाचा जयघोष घुमणार आहे. या उत्सवाला गुरुवर्य ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज, महंत श्री प्रकाशगिरीजी महाराज आणि ह.भ.प. सुविलगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद लाभले आहेत

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम नवमी उत्सव समिती, घोडेगावचे सर्व पदाधिकारी, विविध सेवा संस्था, तरुण मंडळे आणि ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !