नजीक बाभुळगावात वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे थाटात उद्घाटन

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

शेवगाव (अहिल्यानगर) : तालुक्यातील नजीक बाभुळगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchi Bahujan Aaghadi) नवीन शाखेचा उद्घाटन (New Branch Opening) सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षाने गावपातळीवर आपली बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीही यावेळी जाहीर करण्यात आल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. प्रा. किसन चव्हाण म्हणाले, वंचित बहुजन आघाडी हा सर्वसामान्यांच्या न्यायासाठी लढणारा पक्ष आहे.

पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणे तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे. अध्यक्षीय भाषणात योगेश साठे यांनी, आगामी काळात गावपातळीवर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन केले.

नूतन कार्यकारिणीची घोषणा : या सोहळ्यात नजीक बाभुळगाव शाखेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी खालील निवडी जाहीर केल्या:

  • शाखा अध्यक्ष: विजय घाडगे
  • उपाध्यक्ष: विनोद चांदणे
  • सचिव: राजकुमार घाडगे
  • खजिनदार: अशोक चांदणे
  • सहसंघटक: संतोष घाडगे
  • सल्लागार: शिमोन घाडगे

तसेच, कुरुडगाव येथील महिला आघाडीच्या शाखाध्यक्षपदी अनिता शरद अंगरखे आणि कुरुडगाव शाखाध्यक्षपदी अरुण कडू निळ यांची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा संघटक रवींद्र निळ यांनी दिली.

मान्यवरांची उपस्थिती : या सोहळ्याला भारतीय बौद्ध महासभेचे नितीन खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष शाहूराव खंडागळे, जिल्हा संघटक रवींद्र निळ, तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, युवक तालुकाध्यक्ष ऑगस्टीन गजभिव, वसंत आव्हाड यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, या नवीन कार्यकारिणीमुळे परिसरात पक्षाला मोठी गती मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !