बाणेर पोलिसांनी ५ तासांत जेरबंद केली क्रेनमधील बॅटरी चोरणारी टोळी; ५.६० लाखांचा मुद्देमाल जप्त


पुणे - बाणेर (Baner) परिसरातील विजय सेल्स (Vijay Sales) बाणेर रोड पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या क्रेनमधील तब्बल ५ लाख ६० हजार रुपये किमतीच्या बॅटरी चोरणाऱ्या टोळीचा बाणेर पोलिसांनी अवघ्या ५ तासांत छडा लावला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तीन अट्टल चोरांना (Notorious Criminals) अटक केली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ​दि. २७ एप्रिल रोजी पहाटे ४:०० ते २८ एप्रिल रोजी सकाळी ९:३० च्या दरम्यान फिर्यादी यांनी त्यांच्या क्रेन (Crain) सुरक्षितपणे लॉक करून पार्क केल्या होत्या.

या क्रेनमधील प्रत्येकी ३५,००० रुपये किमतीच्या १६ 'टॉर्झन' कंपनीच्या ब्लॅक बॅटरी (Black Battery) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​असा लागला छडा : ​पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासात घटनास्थळावरील आणि परिसरातील सुमारे १२५ सीसीटीव्ही फुटेजची (CCTV Footage) तपासणी करण्यात आली.

गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिसांनी इंदिरानगर वसाहत, औंध (Aundh) येथून तीन संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेले आरोपी :
  1. सुनील नवनाथ लोखंडे (वय ३०)
  2. साहिल अशोक माने (वय २१)
  3. अक्षय शहाजी बोराडे (वय २८)

मुद्देमाल जप्त : ​पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी साहिल माने आणि अक्षय बोराडे यांच्याकडून चोरीला गेलेल्या सर्व बॅटरी हस्तगत करण्यात आल्या आहेत. तसेच, काही बॅटरी विकून मिळालेली १६ हजार रुपयांची रोकडही पोलिसांनी जप्त केली.

ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत (PI Chandrashekhar Sawant) यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे PI Crime) अलका सरग, सपोनि के. बी. डाबेराव आणि बाणेर पोलीस (Baner Police Station) ठाण्याच्या तपास पथकाने केली आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !