येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
कधी कधी समोरचा माणूस खूप दुःखात (Depression) असतो, तो आपल्या जिवलगांसमोर मन मोकळे करतो, त्याला आतून भरुन आलेलं असतं, फक्त मन मोकळं करायचं असतं.. पण समोरचा करतो काय?
त्या दु:खी जीवाला शहाणपणा, तत्वज्ञान (Philosophy) सांगत बसतो. "आयुष्य असंच असतं, संकटाला शांतपणे, धीराने तोंड द्यावे. ब्ला ब्ला ब्ला...." अर्थात हे तत्वज्ञान त्या दु:खी जीवाला माहिती नसतं का?
सारं कळत असतं मंडळी.! पण त्या क्षणी त्याला त्याचं मन मोकळे करण्यासाठी जिवलगांसमोर मन मोकळे करायचे असते. या 'जिवलगा'ची भूमिका फक्त 'गुड लिसनर'ची (Good Listener) हवी.
कारण शांतपणे समोरच्याचे ऐकून घेणं जमायला हवं, फक्त मी तुझ्यासोबत आहे हे त्या दु:खी जीवाला जाणवून देणं एवढंच सोप्पं असतं. पण दुसऱ्याला शहाणपण शिकवणं आपल्याला आवडतं.
काल धारवाडला एक घटना (Tragic Incident) घडली. मन अस्वस्थ झालं. पत्नी नेत्रविशारद (Ophthalmologist), पती भूलतज्ञ (Anaesthetist) या दांम्पत्याला एक मतिमंद (Special Child) मुलगा होता. पती आपल्या कामात इतका गुंग की या मुलाचं दुःख, सांभाळ याकडे दुर्लक्ष केले.
ती आई होती, ती सहन करत गेली, सहन होईना, भयंकर डिप्रेशनमध्ये (Severe Depression / Mental Health Issues) गेली, कुणासमोर बोलावं वाटलं नाही तिला, ते दुःख, डिप्रेशन तिच्या मनावर इतके हावी (Overpowered) झाले, की झोपलेल्या पतीला चाकूने भोसकले, मुलाला भोसकले..
काल राहून राहून वाटत होते बोलली असती तर.. तिची स्वतःच्या आयुष्याची स्वप्ने पूर्ण झाली नाहीत, की 'ऐकणारा कान' तिच्या आयुष्यात आला नाही..? हे टाळता आले असते (Preventable Tragedy), पण स्वतः डायबेटीसच्या औषधांचा हेवी डोस (Overdose) घेतला.
का बोलली नाही? स्वतःचं मन मोकळं करायचं राहून गेले की तिला ऐकणारा कान मिळाला नाही? हल्ली दु:ख सांगायचीही भिती वाटते. लोक माघारी एखाद्याच्या दु:खाची मजेमजेने चर्चा (Gossip / Backbiting) करतात, केवढं ते कौर्य आतमध्ये जोपासतोय आपण.!
कारण आपण आपल्या हृदयातील संवेदना (Empathy / Emotions) विसरून गेलोय. छोट्या छोट्या गोष्टीत अहंकार (Ego), अपमानाला आहारी जाऊन दुसऱ्याचं ऐकून घ्यायचं राहून जातंय.
आपण जिवंत माणसं आहोत, माणसांना जिवंत रहायला मदत करु... शांत राहून ऐकून घेऊ.! शहाणपण शिकवायचे नाही फक्त ऐकू शांतपणे... जमेल ना मंडळी..?
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)

