जाहिरात

शिवप्रताप दिन | १० नोव्हेंबर १६५९

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

​बेगमेचा फतवा निघाला,
कोण धरणार रे शिवबाला?
अफझलखानाने विडा उचलला,
"जिवंत धरतो मी शिवबाला!"



​भली मोठी फौज घेऊन,
गर्जत गर्जत निघाला,
मंदिरे फोडीत, गावे जाळीत,
खान वाईला येऊन ठेपला!
​॥ जी जी जी रं जी ॥

मराठ्यांसमोर काळ ठाकला रं,
जी जी जी रं जी! ॥
​छत्रपतींनी युक्ती लढविली,
प्रतापगडावर भेट ठरविली,
खानाची मनीषा धुळीस मिळविली,
दहा नोव्हेंबरची तारीख ठरली!

​अहंकारी खानाचा कावा,
शिवरायांनी ओळखला,
कपटाचा डाव रचून खान,
भेटीसाठी सज्ज झाला!
​॥ जी जी जी रं जी ॥

​शामियान्यात दोघे आले,
भेटीसाठी समोर उभे राहिले,
कपटी खानाने डाव साधला,
गळाभेटीच्या बहाण्याने वार केला!
​शिवरायांची मान दाबली,
खंजीराचा वार केला,

पण सिंहासारख्या शिवरायांनी,
खानाचा डाव उलटविला!
​वाघनखांनी घाव घातला,
बिछव्याने प्रतिघात केला,
अफझलखानाचा अंत घडवून,
शिवरायांनी इतिहास रचला!
​॥ जी जी जी रं जी ॥

​सैद बंडा धावून आला,
जिवा महाल्याने त्याला रोखला,
'होता जिवा म्हणून वाचला शिवा',
असा पराक्रम इतिहासात घडला!
​प्रतापगडावर गनिम हरला,
मराठ्यांनी जयघोष केला,

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत,
शिवरायांचा जयजयकार झाला!
​शिवप्रतापाचा दिवस हा,
इतिहासामध्ये अमर झाला,

शिवरायांच्या पराक्रमाचा,
डंका जगभर गाजला!
​बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय!
॥ जय भवानी! जय शिवराय! ॥
॥ जी जी जी रं जी! ॥

​- स्वप्नजा राजे घाटगे (कोल्हापूर)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !