अहिल्यानगर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (ADCC Bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीचा अंतिम निकाल समोर येत असून सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये धक्कादायक व महत्त्वपूर्ण निकाल जाहीर झाले आहेत.
आज पार पडलेल्या मतमोजणीच्या ताज्या फेरीत पारनेर सोसायटी मतदारसंघातून खासदार निलेश लंके (MP Nilesh Lanke) यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
राहुरी मतदारसंघातून माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे विजयी झाले आहेत. तर अकोले मतदारसंघातून संजीवनी शिंदे आणि कर्जत मतदारसंघातून ज्योती शिंदे यांनी विजय संपादन केला आहे.
यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेले ११ संचालक यादी :
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या एकूण २१ जागांपैकी ११ जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली आहे. बिनविरोध विजयी झालेल्या संचालकांची तालुका व मतदारसंघनिहाय यादी खालीलप्रमाणे आहे:
- अहिल्यानगर तालुका: आमदार अक्षय कर्डिले
- राहाता: माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील
- संगमनेर: रणजितसिंह देशमुख
- कोपरगाव: बिपीन कोल्हे
- नेवासा: माजी मंत्री शंकरराव गडाख
- पाथर्डी: आमदार मोनिकाताई राजळे
- शेवगाव: माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले
- श्रीरामपूर: नगराध्यक्ष करण ससाणे
- श्रीगोंदा: दत्तात्रय पानसरे
- जामखेड: सचिन भुमरे
- बिगरशेती संस्था मतदारसंघ: सचिन जगताप
ताजा निकाल आणि विजयी चित्र:
- पारनेर सोसायटी मतदारसंघ: खा. निलेश लंके विजयी
- राहुरी सोसायटी मतदारसंघ: आ. प्राजक्त तनपुरे विजयी
- अकोले सोसायटी मतदारसंघ: संजीवनी शिंदे विजयी
- कर्जत सोसायटी मतदारसंघ: ज्योती शिंदे विजयी
- शेतीपूरक मतदारसंघ : आ. आशुतोष काळे विजयी
टीप : उर्वरित मतदारसंघांमधील आणि राखीव जागांच्या मतमोजणीचे निकाल हाती येत असून MBP Live24 वरून सतत अपडेट केले जात आहेत. ताजे निकाल जाणून घेण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत रहा.
