नवी दिल्ली - भारतीय सीमेवर चिनी घुसखोरी रोखण्यासाठी सरकारने सैन्य दलांना आता संपूर्ण सूट दिली आहे. रविवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ चीफ स्टाफ (सीडीएस) बिपिन रावत यांच्यासमवेत सेना प्रमुख जनरल एमएम नरवणे, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया आणि नेव्ही चीफ करमबीर सिंह यांच्याशी चर्चा केली.
या बैठकीत त्यांनी चीनशी काटेकोरपणे व्यवहार करण्याची सूचना सैन्याने केली. वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्यानुसार, जमीन, आकाश आणि समुद्री भागात चीनकडून होणारी कोणतीही घुसखोरी रोखण्यासाठी सैन्याला चोख प्रत्युत्तर घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे भारत चीन दरम्यानचे वातावरण अद्यापही तणावपूर्ण आहे.