औरंगाबाद - जाधववाडी येथील नवभारत फर्टिलायझर्स दुकानात युरियाची साठेबाजी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी स्वत:च तेथे शेतकऱ्याच्या वेशात जाऊन स्टिंग ऑपरेशन केले आणि या साठेबाजीचा भंडाफोड केला. याची राज्यभरात चर्चा सुरु आहे. शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले असून साठेबाजीला आळा घालण्याची मागणी केली आहे.
- कृषीमंत्री भुसे यांनी स्वत: शेतकर्याचा वेश धारण केला.
- त्यांच्याकडे यापूर्वीच तक्रारी आलेल्या हाेत्या