कोरफड हे नाव आपल्या सगळयांना परीचीत आहे. ही एक औषधी वनस्पती म्हणुन सुपरीचीत आहे. मात्र, विविध प्रकारे आपण कोरफडीचा वापर करून विविध प्रकारच्या त्वचेला साजेसे फेसपॅक बनवू शकतो हे खूप कमी लोक जाणतात.
- मुलायम त्वचेकरता कोरफडीचा फेस पॅक
काकडीचा रस, कोरफड जेल, दही, गुलाब जल, आणि उपयुक्त तेल याचे मउ मिश्रण बनवावे, या मिश्रणाला आपल्या चेह-यासोबत मानेवर लावावे, 10 मिनीटं ठेवल्यानंतर थंड पाण्याने चेहेरा धुउन टाकावा या मिश्रणाने त्वचा मुलायम तर होतेच सोबत चेहे-यावर तजेला येतो.
-कोरडया त्वचेकरता कोरफडीचा फेस पॅक
२ चमचे कोरफड जेल, ५ ते ६ बिनबियांचे खजुर, काकडीचे तुकडे, आणि लिंबाचा रस घेउन एकत्र मिसळावा. रोज या मिश्रणाने चेहरा आणि मानेला मसाज करावा, ३० मिनीटे तसेच ठेवल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवावा.
तेलकट त्वचेकरता कोरफडचा फेस पॅक
कोरफडीचे पानं उकळुन २ चमचे मधासोबत मिश्रण तयार करावं. हे मिश्रण चेह-याला तसच गळयाला लावुन २० मिनीटांपर्यंत ठेवावं. त्यानंतर थंड पाण्याने चेहेरा धुवावा, काही आठवडे हा प्रयोग नियमीत केल्यास त्वचेचा तेलकटपणा संपुर्णपणे नाहीसा होवून त्वचा चमकू लागेल.