सन २०१८-१९ साठीचा हा पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती गुलाबबाई संगमनेरकर यांना घोषित करण्यात आला आहे. रुपये ५ लाख, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही निवड केली.
गुलाबबाई संगमनेरकर यांना जीवन गौरव पुरस्कार
Friday, June 26, 2020
मुंबई - ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना मानाचा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला आहे. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य शासनातर्फे तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते.
Tags