नवी दिल्ली - परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना वंदेभारत अभियानांतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.
आतापर्यंत या अभियानांतर्गत १२५ विमानांनी १९ हजार ६०४ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. तर अद्याप १ जुलै २०२० पर्यंत आणखी ४५ विमानांमधून मुंबईत प्रवासी येणे अपेक्षित आहे.