माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू डीन जोन्स याने धोनीच्या टीम इंडियातील पुनरागमनाबद्दल हे महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. “टीम इंडियाचे संघ निवडकर्ते सध्यातरी ऋषभ पंत आणि लोकेश राहुल या दोघांबद्दलच विचार करत असतील. जर धोनीची आयपीएलमधील कामगिरी दमदार असली तरच धोनीसाठी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. पण जर धोनी आयपीएलमध्ये आपली चमक दाखवू शकला नाही तर मात्र अवघड आहे.
धोनीने स्वत: तो दरवाजा उघडा ठेवला आहे. त्याला मिळालेली विश्रांती त्याच्यासाठी लाभदायक ठरू शकते. पण मला विचाराल तर दीर्घ विश्रांतीनंतर संघात स्थान मिळवणं खूप कठीण असते, असे डीन जोन्स म्हणाला. अर्थातच धोनीच्या चाहत्यांना त्याला कायम मैदानावर पाहणे आवडणार आहे. आयपीएलची कामगिरी भारतीय संघात राहण्यासाठी कितपत महत्वाची आहे, हाही एक मुद्दा आहे.