सैफ आणि करीनाने ते सध्या राहत असलेल्या घराच्याच समोर एक नवीन घर घेतले आहे. या घरात ते लवकर शिफ्ट होणार आहेत. परंतु, सध्या या घराचं काम सुरु आहे. ते काम संपल्यावर सैफ त्याच्या कुटुंबासोबत तिकडे शिफ्ट होणार आहे. त्यामुळे सध्या या नव्या घरातील कामकाज कसं सुरु आहे हे पाहण्यासाठी त्यांना नव्या घरी सतत जावे लागते. तसेच सैफ सध्याचे घर तो भाडेतत्वावर देणार असल्याचेही सांगितले जात आहे.
सैफ आणि करीना घर सोडणार !
Sunday, July 26, 2020
बाॅलीवूड - बॉलिवूडमध्ये कायम चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर खान. चित्रपट असो किंवा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येणारी ही जोडी सध्या त्यांच्या घरामुळे चर्चेत आहे. लवकरच हे दोघं त्यांच्या कुटुंबासोबत राहतं घर सोडून जाणार असल्याचे सांगितले जात आहे. एका मुलाखतीत सैफने देखील याला दुजोरा दिला आहे.
Tags